महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेसाठी फोंडाघाटच्या अजिंक्य विजय पोफळे याची निवड !

Google search engine
Google search engine

 

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –— महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन व क्रीडा युवक संचनालय तर्फे छत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणाऱ्या ज्युदो स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजिंक्य विजय पोफळे याची महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशन- फोंडाघाट येथून त्याचा नियमित सराव होत असून त्याला ज्युदो असोसिएशन सिंधू.चे मार्कडसर, दिनेश जाधव, शिंदेसर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. सध्या अजिंक्य फोंडा हायस्कूल मध्ये कार्यरत असून, त्याच्या निवडीबद्दल फोंडाघाट पंचक्रोशीतून कौतुक होत असून मित्र परिवारातर्फे त्यास स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत….