शिवराळ भाषा वापरणाऱ्या उबाठा सेनेला भाजपा कार्यकर्त्यांनी दिला प्रसाद
आ.नितेश राणे यांनी चर्चेला बसा असे आवाहन करूही तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचा चर्चेतून पळ
मातोश्रीला दाखवण्यासाठी असले आंदोलने करता का? आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेला झापले
आंदोलन करण्याची सवय करून घ्या कारण तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचे आहे आ.नितेश राणे यांचा उपरोधिक टोला
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे देवगड येथे रुग्णालय सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आले होते ही संधी साधून त्यांना अडवण्याचा प्रयत्न सोमवारी उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला मात्र तो हाणून पाडण्यात आला. एवढेच नव्हे तर तर रुग्णालय परिसरात तमाशा करू नका आपण बसून बोलू अशी भूमिका घेत आमदार नितेश राणे यांनी धरलेला हात उबाठाचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी सोडून शेवटी चर्चेतून पळ काढला.
आमदार नितेश राणे रुग्णालय समितीच्या रुग्णालय सल्लागार समितीच्या बैठकीसाठी सोमवारी देवगडला आले होते. ही बैठक सुरू होण्याआधीच उबाठा शिवसेनेचे काही कार्यकर्ते तालुकाप्रमुख गणेश गावकर, याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यासाठी जमले होते. आमदार नितेश राणे यांनी सल्लागार समितीची बैठक आटोपली व ते जाण्यासाठी निघत असतानाच रुग्णालयाच्या पॅसेजमध्येच अडचणीच्या ठिकाणी जमिनीवर बसून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.
आमदार नितेश राणे यांची वाट अडवून हे कार्यकर्ते बसले होते. वास्तविक ते डॉ.विटकर यांना भेटायचे आहे असे सांगत होते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी प्रेस नोट काढून दिशाभूल करणारी विधाने केली त्यांनाही भेटायचे आहे असे सांगत होते मात्र प्रत्यक्षात त्यांनी आ.नितेश राणे यांना अडवण्याची भूमिका घेतली.
आ.नितेश राणे यांनी ही जनता माझीच असून लोकप्रतिनिधी म्हणून मी चर्चा करतो अशी भूमिका घेतली मात्र गणेश गावकर यांनी चर्चा करतानाच आवाज वाढवल्याने तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष तारी यांनी संघर्षाची भूमिका घेतल्याने विषयाला वेगळे वळण लागले. यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष तारी यांनी उर्मट व शिवराळ भाषा वापरल्याने जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व संतोष तारी यांच्यात बाचाबाची झाली.दरम्यान, संतोष तारी यांना हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला पोलिसांनी हस्तक्षेप करून बाजूला काढले.
मात्र तेथे उभे असलेल्या तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचा हात आमदार नितेश राणे यांनी हातात घेत आपण कुठेतरी चर्चेला बसू. शांततेत बोलू अशी सूचना केली. सर्वच जमाव हॉस्पिटलच्या बाहेर आला.आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयाच्या आवारात शांतता राखा आपण बाहेर बसून चर्चा करू अशी भूमिका घेतली. मात्र गणेश गावकर यांनी चर्चेतून पळ काढला विजयदुर्ग विभागाचे तालुकाप्रमुख गावकर हे आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा करत होते या घटनाक्रमादरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते बाजूला उभे राहून बघ्याच्या भूमिकेत होते.
मी केव्हाही कोणत्याही चर्चेला तयार आहे शांततेत बोला केवळ मातोश्रीला दाखवण्यासाठी तमाशा उभे करू नका आम्ही सक्षम आहोत मी या भागाचा आमदार आहे ही जनता माझी आहे ही समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी घेतली होती.मात्र केवळ शोबाजी करणाऱ्या उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांना आमदार नितेश राणे हे समजावूनही ऐकत नसल्याने भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी आक्रमक भूमिका घेताच उबाठा सेनेला नामुष्कीचा सामना करावा लागला.
मी चर्चेसाठी तयार असताना केवळ मातोश्रीला दाखवण्यासाठी आंदोलन करता का अशा शब्दात नितेश राणे यांनी उबाठा गटाच्या शिवसेना नेत्यांना झापले.विरोधी पक्ष आंदोलन करतातच तुम्ही सवय करून घ्या कारण तुम्हाला कायमच विरोधी पक्षात राहायचे आहे असा टोलाही त्यांनी लागावला.