आचरा देवगड रस्त्यावर स्विफ्ट डिझायर व इर्टिगा कारमध्ये अपघात

Google search engine
Google search engine

आचरा | प्रतिनिधी 

आचरा देवगड रस्त्यावर मशवी गावव्हाळ येथे वळणावर आचरा दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला देवगड दिशेने भरधावं जाणाऱ्या इर्टिगा कारने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.मात्र दोन्ही गड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे हा अपघात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

सचिन पवार हे आपल्याला ताब्यातील स्विफ्ट डिझायर ही कार घेऊन मिठबाव येथून मालवण येथे जात होते त्यावेळी मशवी गावव्हाळ येथे आले असता आचरा मार्गे देवगड दिशेने येणाऱ्या एर्टिगा कारने त्यांच्या गाडीला समोरून विरुद्ध दिशेने येत जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कीं दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचुर झाला. सदर एर्टिगा कार हि कोकणात फिरण्यास आलेले सांगली येथील रोहित बेंद्रे यांची असून त्यांच्या गाडीत त्यांच्यासह आठ जण प्रवाशी होते अशी माहिती स्थानिकांनी दिली.