स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्यावतीने सत्कार सोहळा
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ॲड.दीपक पटवर्धन हे हिरा असून महाराष्ट्रात ते सहकार क्षेत्रात दीपस्तंभ आहेत,असे उदगार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी काढले.ते पुढे म्हणाले की,पतसंस्था राज्य फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे ही कोकणातील सहकार क्षेत्रातील अभिमानाची गोष्ट असून हा कोकणाचा सन्मान आहे,सहकार क्षेत्रातील कायदेशीर बाबींची सर्व माहिती असणारे,अभ्यासु नेतृत्व आहे.पतसंस्थाच्या वसुलीसाठी राज्य फेडरेशनने विशेष पुढाकार घेऊन त्यासाठी योग्य धोरण आणणे गरजेचे आहे त्यासाठी ॲड.दीपक पटवर्धन यांनी जास्त लक्ष दयावे असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचा आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम आज रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, द. रत्नागिरी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर,रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे,जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार,राजापूर भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव,लांजा भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, संगमेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव,रत्नागिरी भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे,रत्नागिरी शहर भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष संतोष पावरी,देवरुखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाली शेट्ये,तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी उपस्थितीत होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच अमर रहाटे(धामणसें),श्रीकांत मांडवकर( प्रिंरदवणे),लक्ष्मण सारंग (गावडे आंबेरे),नीलेश लोंढे (फणसवणे),तन्वी कोकजे (निवळी) यांचा कमळ सन्मान देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र स्टेट मिनी ओलंपिक मध्ये यश संपादन केलेल्या तनया महेश मिलके (रोप्य पदक), आर्यन प्रशांत घडशी (रोप्य पदक), निपुण सचिन लांजेकर ( कास्यपदक), करण महेश मिलके (कास्यपदक) ) यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
सत्कारमूर्ती ॲड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगरवाचनालय, रत्नागिरी यांच्यावतीने करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले की,काम करत असताना आपले मागे कोण उभे आहे हे अतिशय महत्वाचे आहे,राज्य फेडरेशनची निवडणूकीची व्याप्ती खूप मोठी होती परंतु रत्नागिरीतील सर्व पतसंस्थानी खूप मोलाची मदत केली.ते पुढे म्हणाले कि, सहकारमहर्षी कै. गोविंदराव निकम यांनी रत्नागिरी मध्यवर्ती बँकेत जे मोलाचे मोलाचे मार्गदर्शन केले ते माझ्या जीवनातील सहकार क्षेत्रातील टर्निंग पॉईंट ठरले. राजकारण व सहकार या क्षेत्रात काम करताना योग्य अंतर ठेवून काम करणे गरजेचे आहे,राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष ही मोठी जबाबदारी असून परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने वेगळ्या उंचीवर नेऊन जावू असा विश्वास ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
यावेळी स्वामी स्वरूपानंद पत संस्थेचे संचालक जयप्रकाश पाखरे,सरपंच धामणसे ग्रामपंचायत अमर रहाटे,प्रिंरदवणे ग्रामपंचायत श्रीकांत मांडवकर,जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे,नगर वाचनालयाचे चंद्रशेखर पटवर्धन,लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर,जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर,खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष संतोष पावरी,राजापूर कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रमुख ,सहकार क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रास्ताविक नगर वाचनालयाचे आनंद पाटणकर, तर आभार प्रदर्शन स्वामी स्वरूपानंद पतपेढीचे व्यवस्थापक मोहन बापट यांनी केले.