शीतल केळकर यांचे निधन

रत्नागिरी : शहरातील जाेशी पाळंद येथील रहिवासी शीतल लक्ष्मण केळकर (६२) यांचे गुरुवारी (५ ऑक्टाेबर) दुर्धर आजाराने निधन झाले. त्या गाडीतळ येथील के. पी. अभ्यंकर मूकबधीर विद्यालयातून काळजीवाहक म्हणून सेवानिवृत्त झाल्या हाेत्या.

शीतल केळकर यांचे मूळ घर आडिवरे (ता. राजापूर) येथे असून, नाेकरीनिमित्त त्या रत्नागिरीत स्थायिक झाल्या हाेत्या. त्यांचे पती लक्ष्मण केळकर हे फाटक हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाले आहेत. प्रेमळ, धार्मिक वृत्तीच्या म्हणून त्या परिचत हाेत्या. गेले काही दिवस शीतल केळकर या आजारी हाेत्या. गुरूवारी दुपारी अचानक त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्याेत मालावली. जाेशी पाळंद येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी नातेवाईक, समाजबांधव तसेच नागरिक उपस्थित हाेते. त्यांच्यावर मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, दीर, भावजय असा परिवार आहे.