कु.अमृता परब हिची नौ- सेनादलात निवड, ही समस्त फोंडावासीयांसाठी अभिमानाची अन गौरवाची गोष्ट ! — सौ. संजना आग्रे

कु.अमृता सह तिची आई- भाऊ यांचे फोंडाघाट मध्ये मुक्त कौतुक !.

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — आपले नौ-सेनेचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण करून, फोंडाघाट मध्ये आलेल्या कु अमृता अजय परब, हिचे फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये आनंदात स्वागत करून, तिचा श्रीफळ-शाल- पुष्पगुच्छ देऊन सरपंच सौ.संजना आग्रे यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी ग्रामसेवक कोलते, सदस्य पिंटू पटेल, अमृताची आई अनुराधा- भाऊ, नातेवाईक अन ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक कोलते यांनी तिचे स्वागत करताना शुभेच्छा पर प्रास्ताविक केले. यावेळी फोंडाघाटवासीया तर्फे अमृताला शुभेच्छा देताना, तिची नौसेना दलात निवड होणे हे, तिचे ध्येयप्राप्तीसाठी सदैव परिश्रम करून न थकता केलेल्या प्रयत्नांचे सार्थक होय, तिने त्यानंतर खडतर प्रथम प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करताना, तिची निवड ही फोंडावासीयांसाठी अभिमानाची- गौरवाची असल्याने तिच्या पाठीशी ग्रामपंचायत सक्षमपणे उभी राहील.तिची निवड गावातील भावी पिढीसाठी नेहमीच दीपस्तंभ राहील. यामागे तिची आई -भाऊ यांची समर्थ साथ आणि प्रोत्साहन सुद्धा पालकांसाठी मार्गदर्शक असल्याने, तेही अभिनंदनास पात्र आहेत,असे कौतुकोदगार सरपंच सौ. संजना आग्रे यांनी काढले. मात्र या महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम चार भिंतीमध्ये केल्याचे संपूर्ण गावात आश्चर्य व्यक्त होत आहे —–