रंगीत संगित दिंडी आणि चिमुकल्यांच्या भजनात भावीक मुग्ध
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –– आज फोंडाघाट बाजारपेठेतील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने, शेवटच्या दिवशी, फोंडाघाट केंद्रशाळेतील मुला-मुलींनी पारंपारिक वेशभूषा करून ऐतिहासिक पात्र जिवंत करत, पेठेतून हरिनामाच्या जयघोषात , लेझीमच्या तालावर रंगीत संगीत दिंडी काढली. त्यामध्ये मुख्याध्यापिका सृष्टी गुरव, सहशिक्षिका वेदांती नारकर, रंजना पाटील, मुला-मुलींचे पालक मुलांसोबत दिंडीमध्ये सहभागी झाले होते.दिंडी मंदिरात पोहोचल्यावर आपल्या छोटेखानी भजनात सर्वजण तल्लीन झाले.याचा पेठेतील ग्रामस्थ, अबाल वृद्धांनी उपस्थित राहून, आस्वाद घेतला. आणि छोट्यांच्या पारंपारिक वेशभूषेचे आणि कलेचे कौतुक केले. मंदिरातील प्रसाद घेऊन छोट्यांची दिंडीने,पुन्हा एकदा शाळेकडे प्रस्थान केले. यावेळी मंदिरात बालकृष्ण “खेळीया” मुलांमध्ये रमल्याची चर्चा उपस्थित मधून व्यक्त होत होती…