” निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे– संदेश वाडीवर पोहोचणार
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फोंडाघाट एसटी स्टँड नजीक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांचे वजन,ब्लड प्रेशर, मधुमेह याची तपासणी करून, तसेच त्यांचे आरोग्य- कौटुंबिक परिस्थिती इत्यादी माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. असे आरोग्य शिबिर गावातील प्रत्येक वाडीवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याचे महत्त्व पोहोचणार असून, ग्रामस्थांना सजग करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर गणेश यादव व डॉक्टर सूर्यवंशी मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली, अमोल केंद्रे, विलास फोंडके, सेजल कदम, वैदेही वंजारे, संचिता जाधव इत्यादींनी उपस्थित राहून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. शिबिराला बाजारपेठेचे दिवशी दक्षिण व उत्तर बाजारपेठेतील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.