माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दैनदिन सुरु असलेल्या शेतीच्या कामात आधुनिक अवजरांचा वापर कसा करता येईल,कीटकनाशकंचा वापर कसा करावा?,कुकूटपालन,दुग्धव्यवसाय,आदी अनेक विषयावर कृषी कन्याकांनी सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला आंबव पोंक्षे गावचे सरपंच शेखर उकर्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर,अन्य ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना उत्कर्षा जालगावकर,स्नेहल महाडिक,आकांक्षा शिंदे,अंजली शिंदे,चैताली बारावकर,व सिद्धी बारगुडे आदी कृषीकन्यकांनी मार्गदर्शन केले.