माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मधील १९९८ साली एस एस सी ला असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला. माखजन इंग्लिश स्कूल, माखजन या शाळेची स्थापना ७ जानेवारी १९१८/या दिवशी झाली.शाळेच्या १०५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १९९८च्या १० वीच्या बॅच ने स्नेह मेळावा घेतला.शाळा सोडल्याला २५ वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने या सर्व माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी ” मैत्रीचा रौप्य महोत्सव” आयोजित आयोजित केला होता.
शाळेच्या सर्व माजी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे पाद्यपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद साठे ,मुख्याध्यापिका सौ,रूही पाटणकर,इंग्रजी माध्यमाच्या सौ.धनश्री राजेसावंत भोसले आणि सर्व आजी माजी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,सेवक या वेळी उपस्थित होते.यावेळी संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर शाळेत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. दरम्यान माजी शिक्षक,कर्मचारी आणि सेवक यांचा माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी श्रीफळ,भेटवस्तू आणि मानपत्र देऊन सन्मान केला,तर शाळेला किबोर्ड आणि ड्रम सेट भेट दिला. त्या बरोबर पंचक्रोशीतल्या ५ हुशार मुलांना यावेळी माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी रोख रक्कम मदत म्हणून दिली . या सर्व कार्यक्रमाला पंचक्रोशीतल्या माखजन,मावळंगे,कासे ,आरवली ,बुरंबाड याशिवाय पुणे, मुंबई, दापोली, रत्नागिरी, पालशेत, सातारा, महाड,कोल्हापूर,दुबई येथून माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश नाईक यांनी केले तर सूत्र संचालन श्री. पुरुषोत्तम बेलवलकर यांनी केले. श्री. पराग लघाटे यांनी आभार मानले. गप्पा गोष्टी ,धमाल मस्ती आणि एकमेकांची माहिती घेत हा मेळावा साजरा करण्यात आला. स्नेहभोजन,शाळेची सफर, शाळेचे दिवंगत शिक्षक,कर्मचारी,सेवक आणि सदस्य यांना श्रद्धांजलि अर्पण केली. वंदे मातरंम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.