कळंबुशी सरपंच सचिन चव्हाण यांचा सत्कार

Google search engine
Google search engine

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायत सरपंच पदग्रहण सोहळा नुकताच झाला.यावेळी सचिन चव्हाण यांचा सत्कार करून ग्रामस्थानी शुभेच्छा दिल्या. यावेळी यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत कळंबुशी ग्रामपंचायतीवर गावंपॅनलने यश मिळवले. यावेळी उपसरपंचपदी श्री. आकाश जयप्रकाश चव्हाण यांची निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षकांनी जाहीर केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच पदग्रहण व उपसरपंच निवड पार पडली. यावेळी गावपॅनलचे नवनिर्वाचित सदस्य श्री. दिनेश परशुराम चव्हाण, सौ. मधुरा मुकेश आग्रे, सौ. सुश्मिता मिलिंद काजवे आणि माजी सर्व सदस्य तसेच श्री. बावाशेठ चव्हाण, श्री. मुकेश चव्हाण, श्री. सुशील चव्हाण, श्री. समीर चव्हाण, श्री. वसंत गावडे, श्री. राजू चव्हाण, श्री. सतीश चव्हाण, श्री. सदानंद चव्हाण, श्री. रितेश चव्हाण. श्री. प्रशांत घाटगे, सौ. मिताली फेपडे, सौ. पूजा चांदीवडे, सौ. प्रियांका पाचकुडे व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रसंगी गावच्या पोलिस पाटिल सौ. सोनिया चव्हाण यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या