माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ऍड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ,रत्नागिरीतील जनशिक्षण संस्था व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कोर्सेस ना प्रारंभ झाला आहे. जनशिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सीमा यादव यांच्या हस्ते या फित सोडून व श्रीफळ वाढवून या कोर्सेस चा शुभारंभ झाला.सध्या प्रशालेत ब्युटी पार्लर मदतनीस व सहाय्यक संगणक ऑपरेटर या कोर्सेस सुरु झाले आहे आहेत.अत्यल्प प्रवेश फी असल्याने या कोर्सेस चा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
यशस्वी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडून स्किल इंडिया अंतर्गत प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.दरम्यान उदघाटनाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जे डी पराडकर,संस्था अध्यक्ष आनंद साठे,उद्योजक सुशील भायजे,पोलीस पाटील दत्ताराम मोरे,उपाध्यक्ष मनोज शिंदे, राजेश फणसे,संदेश पोंक्षे,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,भाऊ पोंक्षे,दिलीप जोशी आदी उपस्थित होते.