सिंधूफार्मा आयोजित क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग वॉरियर्स संघ विजेता

आचरा | अर्जुन बापर्डेकर : सिंधूफार्मा आयोजित , सिंधुदुर्ग वैद्यकीय प्रतिनिधींच्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग वॉरियर्स संघ तर द्वीतीय क्रमांक सिंधुफार्मा संघ यांनी मिळवला या स्पर्धेत, वैद्यकीय प्रतिनिधी परिवारातील पाच संघानी भाग घेतला होता.त्यात कणकवली वॉरियर्स , सिंधुदुर्ग वॉरियर्स , रायझिंग स्टार सिंधुदुर्ग , यक्षिणी माणगाव , सिंधुफर्मा संघ यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्नेह भोजनाची व्यवस्था आयोजक कडून करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन श्री अरविंद मुंज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत पंच म्हणून श्री रामचंद्र शृंगारे , सहदेव बहिरे , प्रमोद सावंत , परेश नार्वेकर , प्रकाश निकम , अनंत दळवी व दळवी बंधू (अंब्राड) यांनी काम पाहिले. ही स्पर्धा भगवती आब्राड मैदान वर झाली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग वॉरियर्स संघ तर द्वीतीय क्रमांक सिंधुफार्मा संघ यांनी मिळवला , यात उत्कृष्ट फलंदाज- कृपेश धुरी ,उत्कृष्ट गोलंदाज- विजय टिलवे , अंतिम सामना सामनावीर – संदेश तंबोलकर तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून राघवन मराठे , संदेश तंबोलकर आणि मालिकावीर म्हणून वामन कावले ठरला. तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर म्हणून मेडल देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री संजय घाडीगावकर साहेब , श्री सूर्यकांत नाईक , सचिन कांबळी , सुमित सामंत, सचिन आपटे यांच्या शुभहस्ते झाले. या स्पर्धेसाठी श्री गजानन डिस्ट्रिबुटॉर्स, ओम साई मार्केटिंग , अन्नपूर्णा एजन्सी , दत्ता डिस्ट्रिबुटॉर्स , यांनी आर्थिक सहकार्य केले. यावेळी दत्ता देसाई , श्री परब , श्री सरंगले , राजू मालांडकर आदी उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख म्हणून विजय दळवी यांनी काम पाहिले .