“जीवनाचे सार” या पुस्तकाचे सोनावल मध्ये प्रकाशन 

 

दोडामार्ग l सुहास देसाई :संस्कूतीबाबत वेदांतिक सत्याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या युवकांना आपल्या संस्कृतीचा परिचय करुन देणे हे सार आहे यातून निसर्ग जीवजंतू प्राणी माञ त्याच्या कल्यानामध्ये कोणते मार्ग आहेत याची जाण होणे अहम साध्य आहे याव्दारे आपलं पर्यायाने राष्ट्रांचे जीवन समुद्ध होईल अशा विश्वास पुस्तकाचे लेखक तथा सेवा निवृत्त शिक्षक अंकुश रामचंद्र सावंत यांनी व्यक्त केला आहे

नुकतेच त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन सोनवलध्ये झाले याबाबत त्यानी आपल्या पुस्तकातील लेखात

देशातील युवक पाश्चात संस्कृतीचे अनुकरण केल्यामुळे वाहत गेला आहे त्यामुळे भविष्यात आणखीन बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीबाबत वेदांत्तिक सत्याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या युवकांना व सर्व सामान्य जनतेसाठी संस्कृतीचा परिचय करून देणारे लेख “जीवन सार” ह्या पुस्तकाच्या गाभा आहे

गेली पन्नास वर्षे श्री अंकुश रामचंद्र सावंत हे नारायण विधी अत्रीनाथ दत्त जनार्दन एकनाथ, भागवत साप्रदायांचे अभ्यासक आहेत तसेच ते सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक आहेत त्यांनी अनेक विद्यार्थि घडविले आहे त्याच्या या अभ्यासाचा उपयोग जे ज्ञान आत्मसात केले ते सर्वदूर जावे यासाठी जीवनाचे सार या पुस्तकातून लेख प्रसिद्ध केले आहे

पुर्थवी तलवार जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा काहीतरी कार्यभार असतो त्याच्या नुसार आत्मज्ञानानं तो आपला कार्यभार पूर्ण करीत असतो झाडे, फळे देतात, गाय दूध देते, नदी पाणी देते ही त्यांची कार्य निसर्ग नियमानुसार होतात तसेच मनुष्य जिवाची कर्तव्य आहे जन्माला आलो त्यांचे कारण, आपण संसार करण्यासाठीच आलो काय? धन, पैसा जमीन, जहागिरी, सोने, चांदीं, राजवाडा बनविण्यासाठीच आपण जन्म घेतला काय? नोकरी करुन कुंटूब चालविणे, एकाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान मिळवून आपला उद्योग व्यवसाय, पारंपरिक धंदा पूर्णत्वास नेणे म्हणजेच जीवन काय? नाही ना? आपला जन्म कशासाठी? हे जाणून वागणे हेच या जीवनाचे सार या पुस्तकातून लेख प्रसिद्ध केले त्यांचे सार आहे

या पुस्तकांचे प्रकाशन सोनावल सातेरी मंदिर येथे तिलारी जल संपदा विभागाचे उपविभागिय अभिंयता श्री कविटकर यांचे हस्ते झाले आहे यावेळी पुस्तकांचे लेखक अंकुश रामचंद्र सावंत (केसरकर गुरुजी) जेष्ठ ग्रामस्थ रामराव देसाई, सामजिक कार्यकर्ते संजय नाईक, रामचंद्र देसाई सातू गवस आदीग्रामस्थ

हिंतचीतक व साप्रदाय प्रेमी मोठ्यप्रमाणावर उपस्थित होतेया पुस्तक प्रकाशनासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वाचे आभार मानले आहे व प्रेरणा देणारे सदगुरू व आई वडील यांची प्रेरणा असल्याचं लेखक अंकुश रामचंद्र सावंत यांनी सांगितले