मुंबई विद्यापीठांतर्गत कोकण झोनच्या आठले सप्रे महाविद्यालय, देवरुख, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन खेळाच्या स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे. कणकवली कॉलेजच्या बॅडमिंटन संघात अथर्व पोरे, कुणाल कदम, आदित्य कामत, आर्यन केळुस्कर, भूषण सावंत व विघ्नेश नारकर या खेळाडूंचा सहभाग होता. संघप्रमुख म्हणून प्राध्यापक स्वप्निल कदम सहभागी होते.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ.राजेन्द्र मुंबरकर यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. विद्यापीठाच्या कोकण विभागीय पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाचा संघ यशस्वी ठरल्याने सर्व खेळाडूंचे सर्व थरात विशेष अभिनंदन होत आहे.













