सावंतवाडी । प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने अजिंक्य पद पटकावत विभाग स्तरावर क्रिकेट स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.संघातील सर्व खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.