मंडणगड l प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शऩाने मंडणगड पंचायत समिती यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या विद्यमाने 10 ऑक्टोंबर 2023 रोजी भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयात आयोजीत केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीरास तालुक्यातून उत्सर्फुत प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात अस्थिव्यंग, अंध, मंतीमंद, कर्णबधीर, मुकबधीर. अध्ययन अक्षम यांची तपासणी करण्यात आली. या निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार योगेश कदम, जिल्हा शल्य चिकीत्सक संघामित्रा फुले, गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, डॉ. सगरे, डॉ. पभाकर भावठाणकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य विनोद जाधव, माजी जि.प. सदस्या अस्मिता केंद्रे, आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबारात तालुक्यातील 450 हुन अधिक दिव्यांगाची तपासणी करण्यात आली. शिबीराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक वामन मेंढे, विस्तार अधिकारी राजेंद्र मोहीते, पवन गोसावी, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, आऱोग्यसेवक, व अपंग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
आमदार योगेश कदम यांचे शिबीरासाठी विशेष प्रयत्न- यंत्रणेच्या दिव्यांगाकरिता आयोजीत करण्यात आलेले शिबीर दापोली येथे होणार होते मात्र आमदार योगेश कदम यांनी येथील दिव्यांगांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन हे शिबीर तालुका पातळीवर मंडणगड येथे होण्यासाठी विशेष पाठपुरावा करुन तालुकापातळीवर शिबिरासाठी यंत्रणेस कार्यप्रवृत्त केल्याने दिव्यांगाची अडचण दुर झाल्याने आमदारांचे विशेष आभार मानण्यात आले. शिबिरासाठी माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी विशेष सहकार्य केले