कणकवली I मयूर ठाकूर : देवगड तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तरळे येथील रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन सोन्याच्या दागिने रोख रक्कम ८४,५०० रुपयांना एका जोडप्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी कणकवली पोलिसात संशयित जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या प्रकरणातील ती महिला गुजरात मधील असल्याचे समजले. तिच्यासोबत असलेला तो व्यक्ती त्या महिलेला ७००० रु. रक्कम देऊन आपल्यासोबत घेऊन आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र त्यांनी पोलीस आपल्या जवळ पास आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणावरून आपल्या ताब्यात असणारी कार त्याच ठिकाणी ठेवून पोबारा केला. असाच एक गुन्हा कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती देखील कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांच्याकडून समजले. पोलीस निरीक्षक हुलावले याना संपर्क केला असता त्यांनी कुडाळ मध्ये देखील असाच एक गुन्हा असून देवाच्या प्रसादाच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन लुटल्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले. मात्र आपण या प्रकरणी वेळोवेळी संबंधितांवर करडी नजर ठेवून असल्याचे देखील हुलावले यांनी सांगितले.
मात्र या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्यात दिवसाचे आणीत विश्वासाने फिरणे देखील धोक्याचे बनले. दिवसा घडणाऱ्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच मागील कित्येक महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे प्रकार सुरूच असून प्रत्येक घटनेची त्या त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात नोंद होते मात्र, कमी प्रमाणात त्या प्रकरणातील चोरटे गजाआड झालेले समोर येते.
असे असताना कणकवली, कुडाळ पोलिसांनी अतोनात प्रयत्न करत या गुन्ह्यात मिळालेल्या एका CCTV फुटेज वरून आरोपींना कॅप्चर केले होते. सदर रिक्षा चालकाला लुटण्याच्या प्रकरणातील ज्या संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांना शोध घेणे थोडे सोपे झाले होते. आरोपी एका हॉटेलमध्ये काही कारणास्तव थांबलेला फोटो देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र हा प्रकार देवगड मध्ये घडल्याने कणकवली पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून तो शून्य नंबरने देवगड पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी फरार झाले असले तरी काही पुरावे ते या ठिकाणी सोडून गेले आहेत. आरोपींची नावे देखील पोलिसांना समजली आहेत. मात्र खरो त्याच व्यक्ती आहेत हा पोलिसांचा विश्वास आहे. असे असले तरी एवढ्यात आरोपींची नावे मीडियाने पसरवू नये कारण हातात आलेले आरोपी हे फरार होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. मात्र, लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.