रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढीच्या पावस शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी : दि. ०८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढीच्या पावस शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र कुरतडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अनंत नैकर गुरुजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पावस पंचक्रोशीतील बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. संस्थेचे कार्यालय पूर्वीच्या घाटकर निवास, स्वामी स्वरूपानंद आश्रमाच्या येथून सभासदांच्या सोयीसाठी पावस एस. टी . स्टॅन्ड च्या समोर, बळगे व्यापारी चाळ येथे स्थळातंर केले आहे. नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त संस्थेच्या सभासदांसाठी संस्थच्या ठेवी आणि कर्ज सुविधाबाबत मार्गदर्शन ठेवण्यात आले अध्यक्ष श्री कुरतडकर सर यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचाली बाबत मार्गदर्शन केले.

घवाळी सर यांनी कर्ज प्रकारां बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.गोणबरे साहेब यांनी संस्थेच्या विविध प्रकारच्या ठेवीन बाबत माहिती दिली. आणि सर्व कार्यकर्ते यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाला संस्थेचे तज्ञ् संचालक दिपक घवाळी सर, दामोदर गोणबरे, भालचंद्र डाफले आणि संस्थेचे सभासद दिपक आग्रे, गोपाळ रोकडे गुरुजी, लीलाधर कूड, सचिव भातडे, शशिकांत म्हादये, विजया गुळेकर, शेखर नानरकर, दत्ताराम तांबे, सदानंद ठीक, सचिन भातडे, चंद्रकांत बनकर, दीपक बोलये, कृष्णकांत शिवगण, समाजसेवक रविंद्र भातडे, हेमनाथ खरडे आदी कार्यकर्ते आणि संस्थचे रत्नागिरी शाखा कर्मचारी अमर सनगरे, जयेश भारती, जाकादेवी कर्मचारी पूनम वेलोंडे, खंडाळा शाखा स्वराज शीतप, पावसा शाखा प्रथमेश शेडगे आदी कर्मचारी आणि वसुली अधिकारी पी. एम. देसाई, शामराव विठल बँकेचे मॅनेजर नावले साहेब, निखिल उपाध्यय आदी मंडळी कार्यक्रमास उपिस्थत होते. दीपक घवाळी साहेबानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थीतांचे आभार मानले.