रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील वेतोशी येथील आंबा-काजुच्या बागेतील फणसाच्या झाडाची फांदी तोडताना खाली पडून गंभिर जखमी झालेल्या नेपाळी कामगाराचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.15 वा.घडली.
रमेशकुमार जागुराम चौधरी (30, मुळ रा.कैलाली, नेपाळ सध्या रा. वेतोशी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तो वेतोशी येथील फणसाच्या झाडाची फांदी तोडत होता. त्यावेळी अचानकपणे फांदी तुटल्याने तो खाली पडून त्याच्या डोक्याला गंभिर दुखापत होउन तो बेशुध्द पडला. त्याच्या साथिदारांनी त्याला जाकादेवी येथील आनंदी नर्सिंग होममध्ये दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतू त्याची तब्बेत खालावल्याने त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी रमेशकुमारला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.