उबाठा सेनेच्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमाला शहर भाजपचे प्रतिआव्हान

होऊद्याच चर्चा  झळकले बॅनर

उबाठा सेनेच्या वतीने देवगड येथे आज होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याला देवगड शहर भाजपच्या वतीने बॅनर लावून होऊद्याच असे प्रतिआवाहन दिले

देवगड जामसांडे नगरपंचायतीमध्ये होणारा कारभार बॅनर द्वारे चव्हाट्यावर आणून चर्चा , असे बॅनर मध्ये म्हटले आहे ठिकठिकाणी आज हे बॅनर प्रदर्शित करण्यात आले
या बॅनर वर

मागील २ वर्षात उबाठा सेनेच्या

कार्यकाळातील अपयशी कारभारावर होऊदे चर्चा

• शहरातील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी कधीही न झालेल्या वणवणीची होऊदेच चर्चा

कचरा व्यवस्थापनाचे भोंगळ नियोजन

• स्थानिक मच्छी विक्रेत्या महिलांची गैरसोय

• मोकाट गुरांमुळे जनतेला होणार नाहक त्रास

• डास प्रतिबंधक धूर फवारणी न झाल्यामुळे होणारे डेंग्युसारखे साथीचे रोग

• जाहीर केलेल्या फसव्या विविध योजना

• मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रासाची होऊदेच चर्चा

• बंद स्ट्रिट लाईटची होऊदेच चर्चा

• स्वच्छता कर व आरोग्य कर वाढीची होऊदेच चर्चा

• दोन वर्षांत झालेला भ्रष्टाचाराची होऊदेच चर्चा

असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे उबाठा सेनेचा होऊ द्या चर्चा या कार्यक्रमापेक्षा याच बॅनरची चर्चा देवगड शहरात आहे