तालुक्यातील सर्व चिरेखाण मालकानी उपस्थित राहण्याचे आवाहन
चौके l प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची अत्यंत महत्वाची सभा शुक्रवार दिनांक १३आॅक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता जानकी हाॅल,कुंभारमाठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.तरी मालवण तालुक्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला उपस्थित रहावे.असे आवाहन मालवण तालुका चिरेखाण संघटना अध्यक्ष श्री.दत्ता गावडे व सचिव बंड्या गावडे यांनी केले आहे.
यावेळी चिरेखाण बाबत सुप्रिम कोर्टामध्ये चालू असलेल्या केस बाबत व चिरेखाण व्यावसायिकांना येणार्या अडचणी बाबत चर्चा करण्यात येणार आहे.तरी मालवण तालुक्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला हजर रहावे.