रत्नागिरी : जी एन खालसा कॉलेज माटुंगा मुंबई येथे दि. 10 ते 11 ऑक्टोबर २०२३ मुंबई अंतर विद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेकरता रत्नागिरीमधील गोगटे महाविद्यालय मधील वेदात सूरज चव्हाण 54 किलो व 46 किलो श्रुती रामचंद्र चव्हाण खालील गटात रौप्य पदक तसेच सई संदेश सावंत हिने 73 खालील गटात कास्य पदक पटकावले. या आदी कोकण झोन तायक्वांडो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून मुंबई विद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेसाठी कोकण झोनच्या संघात आपले स्थान निश्चित केले होते या खेळाडूना एसआरके तायक्वांदो क्लब मारुती मंदिर येथे एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या स्पर्धेकरता जी एन खालसा कॉलेज स्पोर्ट डायरेक्टर ओनकार सिंघ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव करा, गोगटे महाविद्यालय क्रिडा शिक्षक विनोद शिंदे राकेश मलाप, कोकण झोन संघाचे व्यवस्थापक दीपक साबळे, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तालुकाध्यक्ष राम करा, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकवांना, एसआरके तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शितल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.