ज्ञानदेव येंडे यांचे बासरी वादन लक्षवेधी !

 

परमपूज्य भालचंद्र महाराज जयंतीच्या पहिल्याच दिवशी गायनाने पुष्पांजली !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी – कणकवली वासियांचे आराध्य, परमपूज्य भालचंद्र महाराज जयंती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी, फोंडाघाट (बाविचेभाटले) येथील ज्येष्ठ गायक ज्ञानदेव अनंत येंडे यांनी बासरी वादन आणि गायन सादर करून, पहिले पुष्प अर्पण करून सेवा रुजू केली. राग यमन मधील बंदिश बासरीवर सादर केल्यानंतर, “आधी देवss महादेवss दया निधीsss” या बंदिश गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. रागदारी शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांनी अभंग आणि गवळणी सादर केल्या.त्यांना मंगेश मिस्त्री (तबला)चिन्मय सावंत (हार्मोनियम) उदय मिस्त्री (पखवाज) यांनी उत्कृष्ट साथ दिली.या लक्षवेधी सादरीकरणानंतर संस्थेतर्फे यांचा यथोचित गौरव करण्यात आला.