राजापूर l प्रतिनिधी : कधी माहितीच्या अधिकाराचा दुरूपयोग करीत तर कधी राज्यातील अनामिक पेपरचा वार्ताहर असल्याचे नमूद करीत तालुक्यातील काही एकदोन उपद्रवी महाभाग राजापूर शहरातील सार्वजनिक हितांच्या शासकीय विकासकामांना अडथळे निर्माण करीत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे अशा महाभागांना धडा शिकवण्यासाठी राजापूरकर जनतेने पुढे येऊन बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजापूर नगर परिषद, तहसील कार्यालय आदी शासकीय, प्रशासकीय कार्यालयांत अर्ज करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडू लागल्याने अशा प्रवृतींचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज यापूर्वीच चर्चिली गेलेली आहे. मात्र अशा प्रकारांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असल्याने शहरवासीयांतून चिंता व्यक्त केली गेली आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वी तत्कालिन खासदार सुरेश प्रभू यांच्या निधीतून नगर परिषदेमार्फत जवाहर चौक येथील पिकअप शेड इमारत बांधण्यात आली आहे. तर अवघ्या काही वर्षापूर्वी वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर न. प. मार्फतच अॅक्टिव्हिटी सेंटर उभारण्यात आले आहे. या दोन्ही शासकीय वास्तूंचा लाभ शहरवासीयांना होत आहे. मात्र या इमारती पूररेषेत कशा बांधण्यात आल्या. जवाहर चौक येथील नागरिकांसाठी कार्यरत असलेले सुलभ शौचालय कसे बांधण्यात आले ? त्याबाबतची माहिती द्यावी अशा प्रकारचे उद्योग शहराबाहेरील तालुक्यातील एक व्यक्ती सातत्याने करीत असल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तीच्या उपव्यापामागे एक स्वयंघोषी गावपुढारी असल्याची देखील चर्चा आहे. विशेष म्हणजे संबंधित उपद्रवी व्यक्तीने शहरातील एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेलाही प्रचंड त्रास दिल्याचे व हा त्रास सतत सुरूच असल्याचे बोलले जात आहे.
भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने अपवाद म्हणून लोकहितार्थ शासन निकासकामे स्वाज्य नान प्रत्ययान गनाएर पालगजाती करीत याने याद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेलाही प्रचंड त्रास दिल्याचे व हा त्रास सतत सु असल्याचे बोलले जात आहे.
भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने अपवाद म्हणून लोकहितार्थ शासन जी विकासकामे खास बाब म्हणून राजापूर शहरासाठी करीत आहे त्या विकासकामांना आपले उपद्रवमुल्य दाखवण्यासाठी आव्हान देणाऱ्या संबंधित व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी राजापूरकरांना भविष्यात कडक पवित्रा घ्यावा लागणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरावासीयांच्या आहेत