शिरगाव हायस्कूला माजी विद्यार्थी संतोष तावडे यांनी दिली ऐतिहासिक पुस्तकांची भेट 

शिरगाव (वार्ताहर)  शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी संतोष मधुकर तावडे यांनी शिरगाव हायस्कूलमधील ग्रंथालयास १ हजार ४०० रुपये किमंतीची ऐतिहासिक १३ पुस्तकांची देणगी स्वरूपात भेट दिली. सौ. संजना संतोष तावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच कै.मधुकर यशवंत तावडे आणि कै श्रीमती लक्ष्मीबाई यशवंत को साटम यांच्या स्मरणार्थ त्यांनी हि पुस्तकांची भेट दिली आहे.याबद्दल त्यांचे शाळेच्या व संस्थेच्यावतीने आभार मानले आहेत. यावेळी शिरगावचे संतोष तावडे,संतोषकुमार फाटक, स्कूल कमिटी सदस्य मंगेश लोके, शेलार, महेश चौकेकर, प्राचार्य एस.एन.अत्तार पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे आदी उपस्थित होते