शिरगांव l वार्ताहर : देवगड तालुक्यातील चाफेड – भोगलेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक अनंत गोविंद भोगले ( ७५ ) यांचे गुरुवारी १२ ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सूना, एक विवाहित मुलगी, जावई, भावजय, पुतणे, पुतणी , नातवंडे असा मोठा परिवार आहे. ग्राम विकास मुंबई मंडळ चाफेड भोगलेवाडी मंडळाचे खजिनदार रामदास भोगले यांचे ते वडील तर माजी सरपंच सत्यवान भोगले यांचे ते चुलते होत.