आमदार शेखर निकम यांचा करजुवे येथे गावभेट दौरा

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे चिपळूण संगमेश्वर चे आमदार यांनी गावभेट दौरा केला.यावेळी गावातील कार्यक्रमात चाफे मोरेवाडी, मावळतील बाचिमवाडी, चांदिवडेवाडी, वाकसाळवाडी, ब्राह्मणवाडी, कांगणेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार शेखर निकम यांनी करजुवे गावात विविध योजनेतून निधी मंजूर करुन विकास कामे केल्याबद्दल शेखर निकम यांचे ग्रामस्थानी उत्स्फूर्त स्वागत केले.

. आमदार शेखर निकम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना करजुवे गावाकरीता ९५ लाख रु निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे नमूद केले. तसेच उर्वरीत विकास कामे करीता आवश्यक असणार निधीसुद्धा येणा-या काळात देणारच असे सुचित केले. मतदार संघाच्या विकासाठी सर्व ग्रामस्थांनी आपल्या कुंटुंबाप्रमाणे एकत्र राहीले पाहिजे, त्याप्रमाणे आपली मुले शिक्षण घेऊन उच्च शिक्षीत होऊन त्यांच्या माध्यमातून गावाची प्रगती झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी तालुका अध्यक्ष राजेद्र पोमेंडकर, युवक जिल्हा कार्यध्याक्ष सुशिल भायजे, माजी जि.प.सदस्य दिपक जाधव, माजी प.स.सदस्य नाना कांगणे, विभागप्रमुख मयुर बाष्टे,आंबव सरपंच शेखर उकार्डे, अक्षय चव्हाण, गुलाब सुर्वे, सुबोध चव्हाण, शैलेश चव्हाण, दिपक शिगवण, लहू सुर्वे, आर.के.बाचीम, अजय चांदिवडे, अरूण बाचिम, शांताराम बाचिम, पांडूरंग येलंवडे, प्रियांका मोरे, सिताराम बाचीम, भागोजी चांदिवडे, अनंत बाचीम, कृष्णा बाचीम, गोपाळ कांगणे, विष्णू मोरे, दिपक शिवगण, राजन पंडीत, राजू आंबेकर, सुनिल गोवळकर, अजय चांदिवडे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.