रिगल कॉलेजचा उपक्रम
पाटपन्हाळे | वार्ताहर : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळीकडून सामाजिक बांधिलकी जपत निर्मल ग्रामपंचायत तळवली येथे खास महिलांसाठी केक, कुकीज मेकिंग,बेसिक मेकअप व हेअरस्टाईल तसेच कोकम आगळ पासून पेय बनविण्याचे एकदिवसीय मोफत प्रशिक्षण देण्यात आले.तसेच विशेष उपक्रमांतर्गत रिगल कॉलेज शृंगारतळीकडून महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली व निर्मल ग्रामपंचायत तळवली आवारामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमामध्ये प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी तळवली ग्रामपंचायत सरपंच मयुरी शिगवण, सदस्य सविता शिंदे ,पूर्वा पवार,मानसी पोफळे, संतोष जोशी यांचे पुष्प देऊन स्वागत केले व रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. यानंतर हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी महिलांना आइस केक ओव्हनशिवाय कसा बनवायचा तसेच कुकीज कसे बनवायचे,कोकम आगळ पासून विविध पेय कशी बनवायची याबाबत प्रशिक्षण दिले.तसेच फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी महिलांना खास समारंभात करण्यात येणाऱ्या बेसिक मेकअप आणि विविध हेअरस्टाईलचे प्रशिक्षण दिले.
कार्यशाळेमध्ये पुढे डीएमएलटीच्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून तळवली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी तळवली गावातील महिला व विद्यार्थीनी तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, रिगल कॉलेज शृंगारतळीचे विद्यार्थी व सहकारी शिक्षकवृंद उपस्थित होते.रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.संजयराव शिर्के,संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.












