नातेवाईकांनी ओळख पटविण्याचे लांजा पोलिसांचे आवाहन
लांजा (प्रतिनिधी )आज शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी लांजा बस स्थानकात बेवारस स्थितीत पुरुष जातीचा मृतदेह आढळला असून नातेवाईकांनी ओळख पटविण्याचे आवाहन लांजा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
आज शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी येथील बसस्थानकातील प्रवाशांना सदरहू व्यक्ती चक्कर येऊन पडलेल्या स्थितीत आढळून आला होता. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीस बस स्थानकात दाखल झाले. सदर अज्ञात व्यक्तीला उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान सदर अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन लांजा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.