भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा उद्या ‘वाढदिवस अभिष्टचिंतन’ सोहळा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भागवत कराड यांची उपस्थिती

पार्श्वगायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो होणार ‘हाऊसफुल्ल ‘
सावंतवाडी । प्रतिनिधी :
भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा रविवार १५ आक्टोबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर प्रख्यात पार्श्वगायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या शोची जय्यत तयारी करण्यात आली असून चाहत्यांचा उत्साह पाहता हा लाईव्ह शो हाउसफुल होणार असल्याची खात्री आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष खा. सदानंद शेठ तानावडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा कुडाळ मतदारसंघ प्रमुख माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार चंद्रकांत शेटये, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्यावतीने देण्यात आली आहे.
या शोसाठी स्टेज व्यवस्था तसेच हजारो प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, शिरोडा, वेंगुर्ले, माणगाव आदी भागात या शोच्या प्रवेशासाठी रीस्ट बँड उपलब्ध करण्यात होते. हजारो चाहत्यांनी हे बँड नेले. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद पाहून ज्यांच्याकडे बँड नसेल त्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. या शोसाठी सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येणार आहेत.
नगरपालिकेच्या मुख्य जिमखाना मैदानावर हा शो होत असून त्यासाठी भव्य स्टेज व हजारो आसनांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम दर्जेदार व्हावा, या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत.
भाजप व विशाल परब मित्रमंडळातर्फे हा शो होत असून भाजपचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रमंडळ या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेले चार दिवस कार्यरत आहेत. या कार्यक्रमाची भव्य होर्डींग्ज सावंतवाडी शहरासह जिल्ह्यात जागोजागी लावण्यात आली आहेत.
Sindhudurg