गिरणी कामगार संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय

कुंभारमाठ येथे जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार यांच्या बैठकीत निर्णय

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार व त्यांचे वारसदार आहेत. या सर्वाना त्यांच्या न्याय हक्कासाठी, म्हाडा मार्फत मंबई, नवीमुंबई येथे उपलब्ध होणाऱ्या घरांचे लाभ मिळवून देण्यासाठी संघटित पणे एकत्रित करून गिरणी कामगार संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या तथा गिरणी कामगार वारसदार सौ. रश्मी लुडबे यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार यांची बैठक रविवार पार पडली. जिल्ह्यातील विविध भागातून गिरणीकामगार व त्यांचे वारसादर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सौ. रश्मी लुडबे, भाजप तालुकाध्यक्ष तथा गिरणी कामगार वारसदार धोंडी चिंदरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गिरणी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी काम करत असताना पक्ष विरहित संघटना उभारून संघर्ष समिती स्थापन केली जाईल. सर्वांचे अर्ज भरणा केले जातील. कागदपत्र उपलब्ध होताना ज्या काही समस्या उद्भतील त्यासाठी सहकार्य केले जाईल. सर्वांच्या सहभागातून व एकत्रित मेहनतीतून काम करण्याचा प्रयत्न राहील असे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व भागातील गिरणी कामगार व वारसदार यांचे फॉर्म भरणा करून लवकरच संघर्ष समिती जाहीर केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, देवगड तसेच अन्य भागातून गिरणी कामगार व त्यांचे वारसदार उपस्थित होते.