बांदा कट्टा कॉर्नर नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम 

बांदा (प्रतिनिधी) :     बांदा कट्टा कॉर्नर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव सांस्कृतिक कला क्रीडा व समाज विकास मंडळातर्फे आज दुर्गामातेची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी सुश्राव्य भजने व रात्री ९ वाजता दत्तमाऊली पारंपरिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.

सोमवार १६ रोजी रात्री ९ वा. ओंकार कलामंच सावंतवाडी यांचा बहारदार कार्यक्रम होईल. मंगळवार १७ रोजी रात्री ९ वा. नामांकित ग्रुपचा दांडिया, बांद्यातील विवाहित महिलांचा गरबा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. बुधवार १८ रोजी सायंकाळी ४ वा. पाककला स्पर्धा होईल. यासाठी नाचणी हा घटक निश्चित केला आहे. इच्छुक स्पर्धकांनी अपेक्षा नाईक (९९७०६९५२८४) किंवा श्वेता कोरगावकर (९४२३३२०३६७) यांच्याशी संपर्क साधावा.

गुरुवार १९ रोजी रात्री ९ वा. निनादेवी प्रासादिक भजन मंडळ उंडिलचे बुवा व्यंकटेश नर आणि विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजिवली सोनारवाडीचे बुवा प्रविण सुतार यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होईल. शुक्रवार २० रोजी महिलांसाठी कुंकूमार्चन कार्यक्रम होईल. शनिवार २१ रोजी रात्री ९ वा. १५ वर्षांखालील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विवाहित महिलांचा फॅशन शो व खेळ पैठणीचा आदी कार्यक्रम होतील.

रविवार २२ रोजी संध्याकाळी ४ वा. रंगभरण व चित्रकला स्पर्धा, रात्री ९ वा. रायझिंग स्टार म्युझिकल नाईट गोवा यांचा ऑर्केस्ट्रा होईल. सोमवार २३ रोजी रात्री ९ वा. ओंकार मेलोडीज गोवा यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. मंगळवार २४ रोजी दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजता भव्य मिरवणूकीने विसर्जन सोहळा होईल. दररोज सायंकाळी ५ ते ७ दरम्यान सुश्राव्य भजने होतील. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.