शेतीचे मोठे नुकसान ; शेतकरी चिंतेत
कणकवली : मागील काही दिवसंपासून दुपार नंतरच पाऊस जोरदार ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. रविवारी दुपारी पासून यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली असून सर्वत्र काळोख आणि ढगांचा गडगडाट होत होता. तर काही ठिकणी विजा देखील चमकत होत्या. हे दिवस नवरात्रोत्सवाचे असले तरी पाऊस पडणार हे निश्चितच.!
अनेक भागातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. तर काही जणांची भात कापणी सुरू होती. त्यामुळे अचानक अवकाळी पावसाप्रमाणे कोसळणाऱ्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून देखील सुरक्षिततेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात येत आहेत.