वेंगुर्ले पाटीलवाडा येथील पायवाटेचे मजबुतीकरण करणे या कामाचे शिंदे शिवसेनेकडून भूमिपूजन

वेंगुर्ले : प्रतिनिधी :शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून मंजूर झालेल्या वेंगुर्ले शहरातील पाटीलवाडा येथील दत्ताराम वेंगुर्लेकर यांच्या घरापासून बबन परब यांच्या घरा पर्यँत जाणाऱ्या पायवाटेचे मजबुतीकरण करणे या कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून जेष्ठ नागरीक श्री. विनायक परब यांच्या हस्ते करण्यात आले.

या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेचे वेंगुर्ले शहर अद्यक्ष उमेश येरम, शहर संघटक संतोष परब तसेच शबाना शेख, ऍड. श्रद्धा बाविस्कर, रसिका राऊळ, राजु परब, संजय परब, प्रभाकर पडते, बाळा परब, शेखर माडकर, जनार्दन पाटणकर, दत्तात्रय वेंगुर्लेकर, बाळा परब, यशवंत किंनळेकर आदी यावेळी उपस्थित होते.