कणकवली | प्रतिनिधी : शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे ता.कणकवली या गुरुकुलात्मक माध्यमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक दिलीप गोविंद कारेकर (वय ६७) यांचे मंगळवार दि.१० जानेवारी रोजी अल्पशा आजाराने गारगोटी येथे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,सूना, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त मुख्याध्यापक दिलीप गोविंद कारेकर महाराष्ट्रात लौकिक होता. विद्यार्थीप्रिय शिक्षक, गणितज्ज्ञ, शिक्षण महर्षी, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. पस्तीस वर्षे आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कामकाज केले होते. कारेकर सरांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाचे ,शिक्षण क्षेत्राचे अपरिमित नुकसान झालेले आहे.कुंभवडे ग्रामस्थ,माजी विद्यार्थी, यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे..