किमान समान प्रश्नांसाठी अन्यायग्रस्तांच्या सर्व संघटनांनी एकत्र यावे प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर यांचे आवाहन

गुहागर | प्रतिनिधी : आपला लढा हा एका विशिष्ट जमातीचा नाही. तो केवळ महादेव कोळी,हलबा, ठाकूर , मन्नेरवार ,माना , गोवारी किंवा छत्री व इतर एकट्या समाजाचा नाही , तर हा लढा ३३अन्यायग्रस्त समाजाचा आहे. या ३३अन्यायग्रस्त समाजाने, त्यांच्या सर्व पदाधिका-यांनी किमान समान प्रश्नांसाठी एकाच व्यासपीठावर येऊन समान प्रश्नांसाठी काम सुरू करू या, असे आवाहन ‘ऑफ्रोह’ चे प्रसिद्धी प्रमुख व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी केले. ऑफ्रोह सातारा जिल्हा व महिला आघाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरभी मंगल कार्यालय, सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षा सौ.रूख्मिणी धनी, महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ.उषाताई पारशे , ऑफ्रोह पुणे विभाग प्रमुख सौ.भारती धुमाळ , सांगली ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष संजय कोळी, सातारा जिल्हाध्यक्ष तानाजीधुमाळ, सचिव वनदेव ठिगळे, सातारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अंजली बेस्के,पुणे ऑफ्रोह चे सचिव अभय जगताप, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी इंदिरा कोळी , जेष्ठ कार्यकर्ते सुरेश गायकवाड,व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंद्र पौनीकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सभेचे उद्घाटन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीवीराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा रूक्मिणी धनी , सांगली जिल्हाध्यक्ष संजय कोळी, पुणे जिल्हा सचिव अभय जगताप यांनीही यावेळी सभेला मार्गदर्शन केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सेवा निवृत्त कर्मचारीयांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
ऑफ्रोह चे जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ ,सचिव वनदेव ठिगळे , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अंजली बेस्के व उषा कुंभारे यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारती धुमाळ व राणी जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन संगीता दिरंगाने यांनी केले.