मातोंड मधील ग्रामस्थांचा जिल्हा बँक अद्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश

वेंगुर्ले | दाजी नाईक : भारतीय जनता पक्षाच्या जनतेच्या वाढत्या ओढीमुळे, लोकप्रियतेने,आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात होत असलेल्या लोकोपयोगी योजनांच्या आधारे विकास यामुळे प्रभावित होऊन वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड मधील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अद्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षमध्ये जाहीर प्रवेश केला.

मातोंड येथील या प्रवेशावेळी वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर केळजी, मातोंड शक्तिकेंद्र प्रमुख श्री.सोमा मेस्त्री, श्री.सुभाष परब आदी उपस्थित होते. यावेळी प्रवेशामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री.जगदीश परब, आनंद उर्फ बाळा परब, नंदकिशोर परब,प्रशांत (बाज्या ) परब, राजन परब, सुरेंद्र परब, नितीन परब, राहुल प्रभू, विकास परब यांनी पक्षप्रवेश केला. स्वागत कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.