माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे,फिरते वस्तू संग्रहालाय आल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना अनेक विध संग्रहित गोष्टी पाहण्याची संधी उपलब्ध् झाली होती.
माखजन इंग्लिश स्कूल च्या पटांगणात हे फिरते वस्तू संग्रहालय आले होते.माखजन हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री विनोद पाध्ये यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून या वस्तू संग्रहालय सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले केले.वस्तू संग्रहालयात असलेला दुर्मिळ ठेवा पाहण्याची परिसरातील विद्यार्थी व शिक्षक व ग्रामस्थांना पर्वणीच ठरली.यावेळी माखजन हायस्कुल सह अन्य शाळातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थानी फिरते वस्तू संग्रहालाय पाहण्यासाठी रीग लावली होती.
दरम्यान या कार्यक्रमावेळी फिरत्या वस्तू संग्रहालयासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच संगमेश्वर तालुक्याच्या ५० व्या विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांच्या वैज्ञानिक मॉडेल मध्ये तृतीय आलेल्या ओंकार मुळये,व प्रयोग शाळा सहाय्यक गटात द्वितीय आलेल्या सचिन साठे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षक अंबादास घाडगे,सुबोध फणसे,संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिन साठे यांनी केले.