शेती पाणीप्रश्न, दूध उत्पादन याबाबत सकारात्मक चर्चा
मालवण | प्रतिनिधी : शेती पाणीप्रश्न व दूध उत्पादन याबाबत आडवली येथील शेतकरी यांनी माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
दरम्यान निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामस्थांना शेतीसाठी नदी पात्रातुन पाणी उपसा करण्यासाठी जादा क्षमतेचा पंप अथवा लघु पाटबंधारे मार्फत कोणती उपाययोजना करता येईल याबाबत पाठपुरावा व कार्यवाही करून नियोजन केले जाईल. तसेच शेतकऱ्यांना दूध उत्पादन साठी म्हैशी खरेदीसाठी जिल्हा बँक मार्फत अर्थसहाय्यक उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच दूध संकलन साठी गोकुळ माध्यमातून सहकार्य होण्याच्या दृष्टीने योग्य ती प्रक्रिया केली जाईल. शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. असे निलेश राणे यांनी सांगितले. अशी माहिती सुनील घाडीगावकर यांनी दिली. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, राजा गावडे, बाळा राऊत यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. दत्ता सामंत यांनीही शेतकरी वर्गाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे सांगितले.
यावेळी भार्गव लाड, दूर्गाप्रसाद तुळपुळे, भगवान लाड, नारायण पांचाळ, विशाल लाड, सुरेंद्र लाड, प्रकाश राऊळ, संतोष लाड, सतीश लाड, प्रविण लाड, शैलेश लाड, दत्ताराम लाड, विजय लाड, दिलीप मालंडकर, संभाजी साटम, आनंद सुर्वे, अतुल राणे, प्रसाद लाड, गोपाळ लाड, स्वप्निल लाड, नंदकिशोर लाड, आनंद सुर्वे, आनंद लाड, अतुल राणे, संतोष लाड, विशाल लाड, कमलाकर साळकर यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.