श्रावण नंबर १ शाळेचे स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग स्पर्धेत यश.!

 

कणकवली : स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित तिसऱ्या आंतरशालेय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा त्रिमूर्ती हायस्कूल शिरवंडे ता. मालवण येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशामध्ये 50 मीटर धावणे खेळ प्रकारात शाळेतील ओंकार सुनील लाड याने प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळवले. याच प्रकारात ऋत्तिका रूपेश परब हीने द्वितीय क्रमांक पटकावत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. तर नव्या सुरेश राणे हीने 50 मीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल पटकावले व 100 मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. तर या शाळेच्या बारा वर्षा खालील मुलींच्या रिले संघाने 100 × 4 रिले प्रकारात ऋत्तिका रूपेश परब, नव्या सुरेश राणे, रेवा शिवराम परब व वैदेही संतोष जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल श्रावण गावचे सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, पोलीस पाटील धाकु दळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, केंद्रप्रमुख देऊ जंगले यांनी तसेच ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे, रोहिणी पवार, सुवर्णा दळवी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रवासाची व्यवस्था ग्रामपंचायत सदस्य कांता मुद्राळे यांनी करून सहकार्य केले आहे.