खारेपाटणमध्ये देखील उबाठा सेनेला भगदाड

माजी ग्रा. सदस्य व माजी सरपंचांचा भाजपात प्रवेश

कणकवली : मागील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मोठे बदल होत असून उबाठा सेनेतील अनेक नेते मंडळी आता भाजपात प्रवेश करताना दिसून येत आहे. कुडाळ मालवण प्रमाणे आता कणकवली – खारेपाटण मध्ये देखील मकठ्या प्रमाणात उबाठा सेनेतील कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या दाखल होताना दिसत आहेत. सायंकाळी उबाठा गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य उज्वला विरेंद्र चिके, व माजी सरपंच विरेंद्र बाळकृष्ण चिके यांनी उबाठा सेनेतून भाजपात प्रवेश केला.यावेळी संतोष कानडे, वारगाव उपसरपंच नाना कोकाटे, इरफान मुल्ला, अशोक कोकाटे साळीस्ते उपस्थित होते.