महाराष्ट्र ग्राहक पंचायतीची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी

रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संदेश सावंत यांची निवड झाली आहे.भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव माधव जोशी यांनी महाराष्ट्र ग्राहक पंचायत या संस्थेची स्थापना केली. या शासनमान्य संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखा कार्यकारिणी निवड संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय लाड आणि सचिव अरुण वाघमारे यांनी जाहीर केली आहे. ही कार्यकारिणी अशी : अध्यक्ष – संदेश सदाशिव सावंत- रत्नागिरी, उपाध्यक्ष- प्रा. विकास माधवराव मेहेंदळे, चिपळूण, संघटक- डॉ. संजय सावंत, चिपळूण, सहसंघटक – उमेश श्रीकांत आबंर्डेकर- रत्नागिरी, सहसंघटक (महिला) – सौ. सुगंधा गंगाधर बागवे-रत्नागिरी, सचिव – आशीष अनंत भालेकर-रत्नागिरी, सहसचिव (महिला) – सौ. श्रेया कुंदन साळवी-रत्नागिरी, कोषाध्यक्ष- विलास पं. घाडीगांवकर- रत्नागिरी, प्रसिद्धी प्रमुख- बाळकृष्ण विष्णू कोनकर-रत्नागिरी, सल्लागार- शंकर गंगाधर स्वामी-लांजा. या दहा पदाधिकाऱ्यांची एका वर्षासाठी नियुक्ती जाहीर केली आहे.

ग्राहक हा केंद्रबिंदू मानून राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये काम करणारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही एकमेव संस्था आहे. संवाद आणि समन्वयाने ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था काम करणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांचे संघटन, प्रबोधन आणि योग्य मार्गदर्शन तसेच तालुका तेथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची शाखा स्थापन करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांनी सांगितले.