माधवबागच्यावतीने २२ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेलचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ ऑक्टोबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी येथील शाखेत होणार आहे.

या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड असे आजार असलेल्या रुग्णांची तपासणी होणार आहे. तसेच तपासणी अंतर्गत इसीजी, ब्लड शुगर, टीएमटी, ब्लड प्रेशर चेकअप आदी तपासण्या गरजेनुसार करण्यात येतील. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या शिबिराचा जास्तीत-जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी हरिश्चंद्र पवार ९४०३०७३४४४, रामचंद्र कुडाळकर ९७६३७१७७६१, माधवबाग-सावंतवाडी ७७७४०२८१८५ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.