सुभद्रा वाडेकर यांचे निधन

देवगड- प्रतिनिधी

वाडातर येथील सौ. सुभद्रा दत्तात्रय वाडेकर (७३) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आचरा पोलीस स्थानकाचे हवालदार संदीप वाडेकर व देवगड येथील सुजल ॲग्रो केअर मार्टचे मालक लक्ष्मण वाडेकर यांच्या त्या आई होत.