वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक साठी आज गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी थेट सरपंच पदासाठी 8 व सदस्य पदासाठी 35 असे एकूण 43 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पेंडूर ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी 2 व सदस्य पदासाठी 6 एकूण 8 अर्ज दाखल झाले आहेत. खानोली ग्रामपंचायत साठी आज थेट सरपंच साठी 3 व सदस्य पदासाठी 15 असे एकूण 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.वायगणी ग्रामपंचायतसाठी थेट सरपंच पदासाठी 3 व सदस्य पदासाठी 13 असे एकूण 16 अर्ज दाखल झाले आहेत . मातोंड
ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आज एकूण 1 अर्ज दाखल झाला आहे. आजपर्यंत 4 ग्रामपंचायत साठी थेट सरपंच व सदस्य पदांसाठी एकूण 58 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.