बाळासाहेब लबडे” यांची कादंबरी: स्वरूप आणि चिकित्सा”या विषयावर पुणे येथे परिसंवाद

चिपळूण ( वार्ताहर ) : श्री.दिपलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित लि यांच्यावतीने कादंबरी परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथेनवीपेठ,पत्रकार भवन, सभागृह पुणे येथे शुक्रवार दि:२७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. यामध्ये बाळासाहेब लबडे” यांची कादंबरी:स्वरूप आणि चिकित्सा” या विषयावर परिसंवाद होईल.

प्रा.डाँ बाळासाहेब लबडे हे समीक्षक, कादंबरीकार, कवी, गझलकार, गीतकार ,संशोधक,संपादक,साहित्य चळवळीचे मानकरी ,नामवंत वक्ते,अनेक राज्यस्तरिय व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी,विविध वाहिन्यांवर व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात कवितामनामनातली, खारवी बोलीच्या कविता, विडंबन कविता, असे कार्यक्रम सादर करणारे ,पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. खरे- ढेरे-भोसले महाविद्यालय गुहाग येथे गेल्या २५ वर्षांपासून मराठी विभागप्रमुख म्हणून सेवेत आहेत. आहेत.त्यांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित आहेत. या कार्यक्रमात निर्मितीप्रक्रिया भाष्य

प्रा.डाँ.बाळासाहेबलबडे(कादंबरीकार ,कवी,गीतकार, गझलकार, समीक्षक, संपादक,अभ्यासक)करणार आहेत तर कादंबरी भाष्यात”पिपिलिका मुक्तिधाम”(संस्कृती प्रकाशन, पुणे.)यावर वक्ते :प्रा.डाँ नागनाथ बळते (समीक्षक,प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)म्हणून बोलणार आहेत .शेवटची लाओग्राफिया”(अथर्व पब्लिकेशन, जळगाव.) वक्ते म्हणून श्री.लक्ष्मीकांत देशमुख (ज्येष्ठ साहित्यिक,माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)बोलणार आहेत .काळमेकर लाइव्ह” (पद्मगंधा प्रकाशन,पुणे.) वक्ते म्हणून प्रा.डाँ दिपक बोरगावे (ज्येष्ठ समीक्षक,कवी,अनुवादक)बोलणार आहेत. तर अध्यक्ष या नात्याने मनोगत भारत सासणे(ज्येष्ठ साहित्यिक ,माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)यांचे असणार आहे.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिरिष चिटणीस(लेखक आणि अध्यक्ष श्री दिपलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित लि. सातारा.)असतील तर प्रमुख उपस्थितीत.दि.बा.पाटील(ज्येष्ठ साहित्यिक सांगली))डाँ श्रीकांत पाटील(कवी, कादंबरीकार, समीक्षक, कोल्हापुर)श्री बबन धुमाळ (गझलकार पुणे)हे असतील आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर करतील.