राजीव गांधी हॉस्पीटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व आरोग्य सल्ला

दापोली | प्रतिनिधी : येथील सुप्रसिद्ध असलेल्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या सर्व सामुग्रीसह सज्ज आहे. तसेच रूग्णांसाठी मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व आरोग्या विषयी सल्ला देखील देण्यात येणार आहे. हे डॉक्टर १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत रुग्ण तपासणी करणार आहेत.

यामध्ये दुर्बिण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, पोटाच्या शस्त्रक्रिया मुतखडा व पित्ताचे खडे शस्त्रक्रिया स्पेशालिट डॉ. रमेश पाकले, स्त्रीरोग तज्ञ, वंधत्व तज्ञ डॉ. दिपक मेनकी, हृदयरोग स्पेशालिट शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. राजेंद्र गोसावी, डॉ. शितल गोसावी हे १५ जानेवारी रोजी उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून कळविण्यात आली आहे