कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव येथे भरधाव वेगाने जाणारी ( एम. एच. ०४ एच एम ८२३६ ) ही कार पलटी होऊन अपघात झाला. शुक्रवारी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्यासह अन्य स्थानिक ग्रामस्थानी धाव घेत जखमीना मदतकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळी जात जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.