दापोलीत जेष्ठ नागरीकांसाठी डॉ. विद्या दिवाण यांचे व्याख्यान.!

दापोली | प्रतिनिधी : येथील जेष्ठ नागरीक संघाच्यावतीने जेष्ठांना मानसिक, कौटुंबिक व आरोग्या विषयक डॉ. विद्या दिवाण यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विद्या दिवाण यांचा सन्मान करण्यात आला. या व्याख्यान कार्यक्रमाला जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष राजाराम मडव, उपाध्यक्ष अनंत मोरे, सचिव प्रकाश बेर्डे, खजिनदार प्रेमानंद महाकाळ, उपसचिव राधारमण बुटाला, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कदम तसेच शुभांगी गांधी, मंगल सणस, शैलजा मेहता यांच्यासह अनेक जेष्ठ नागरीक उपस्थित होते. पाहूण्यांचा परिचय श्रीकृष्ण पेठे यांनी करून दिला. तर राजाराम मडव यांनी प्रास्ताविक केले तर आभार शैलजा मेहता यांनी मानले.